!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : भोगीची पारंपारिक लेकुरवाळी मिक्स भाजी|bhogichi bhaji kese banate hain|how to make bhogichi bhaji recipe

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

भोगीची पारंपारिक लेकुरवाळी मिक्स भाजी|bhogichi bhaji kese banate hain|how to make bhogichi bhaji recipe

 भोगीची पारंपारिक लेकुरवाळी मिक्स भाजी|bhogichi bhaji kese banate hain|how to make bhogichi bhaji recipe 

                https://youtu.be/rIUYPh3rYs⬅️youtube Li   
                         भारतातील सण आणी ऊत्सव सर्व दूरवर माहित आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत सण आणी ऊत्सवाला फार पूर्वीपासून महत्त्वाचेच स्थान आहे.तसेच भारतात अनेक लोक अनेक भाषिक राहत आहेत. तरीदेखील आपआपल्या पध्दतीत सण आणी ऊत्सव साजरे करतात. आणी केले जातात. 
तसेच सणां प्रमाणे सणवाराचे पदार्थ देखील बनवले जातात. देवांना भोग म्हणा किंवा देवाचा नैवेद्य म्हणून एक विशिष्ट प्रकारचा पदार्थ म्हणून प्रत्येक सणांचा एक पदार्थ ठरलेला असतोच.असाच एक पदार्थ म्हणजेच 

Bhogichi bhaji recipe 

                           जसे की नवरात्र ऊत्सव आला तर आपण नऊ दिवस फक्त उपवासाचे पदार्थ बनवत असतो.
त्याप्रमाणेच गणेश उत्सवात वेगवेगळ्या प्रकाराचे मोदक बाप्पाचा प्रसाद म्हणून बनवत असतो.
तसेच बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवत असतो.
दिवाळी आली वेगवेगळ्या प्रकाराचे फराळ बनवलेले सगळीकडे पहायला मिळतात. बाजारात सुध्दा खास दिवाळी स्पेशल मिठाईया, फराळ विकायला ठेवतात.
अशाच प्रकारचे सणांचे पदार्थ ठरलेले असतात.
                       जानेवारीपासून इंग्रजी महिन्याची नवीन वर्षाची सुरुवात होते.त्यात वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांतीचा सण आलेला असतो.
पण त्या आधी मकरसंक्रांतीच्या आधल्याच दिवशी भोगी चा सण आलेला असतो.
मकरसंक्रांतीत बाजारात पण नवीन नवीन भाज्या विकायला आलेल्या असतात. 
जसे की लाल चुटूक गाजर पण ह्या सिझन मधे बाजारात विकायला आलेले असतात. 
तसेच तुरीच्या शेंगा,पावटे,ओला हरभरा हे ओले माळव,नवीन भाज्या बाजारात विकायला आलेले असतात. 
त्यात भोगीच्या सणात या सर्व भाज्या एकत्र करुन त्याची मिक्स भाजी केली जाते.आणी ज्वारीच्या पिठाची तीळ लावून भाकरी केली जाते.अशी फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे.
तशी पद्धतच आहे.किंवा प्रथा आहे.
                          अशा या मिक्स भाजीला भोगीची पारंपारिक मिक्स भाजी म्हणतात. तर आज आपण या भोगीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. Bhogichi bhaji recipe in marathi.











                 भोगीच्या भाजीची रेसिपी.Bhogichi bhaji recipe ⬇️

या भोगीच्या भाजीत मध्यम आकाराचे वांगे,बटाटा,गाजर, तुरीच्या शेंगा,वाटाणेच्या शेंगा,ओला हरभरा,पावटा,भुईमूग च्या शेंगा.हे मुख्य साहित्य असते.
डिसेंबर, जानेवारीत नविन नविन भाजीच्या शेंगा आलेल्या असतात. त्या एकत्र करुन त्याची भाजी शिजवून भाजी केली जाते.ती भोगीची भाजी.Bhogichi bhaji.

Bhogichi Bhaji Recipe in Marathi. भोगीची भाजी रेसिपी मराठी.

भारतात ग्रामीण भागात किवा खेडेगावात संक्रांतीच्या आदल्याच दिवशी अशी नैवेद्या साठी स्पेशल मिक्स भाजी बनवली जाते.याच मिक्स भाजीला भोगीची भाजी म्हणतात.
भोगीची भाजी कशी बनवायची?
ही भाजी बनवायला फार सोपी आहे.घरातील साहित्यातून ही भाजी बनवतात. घरातीलच मसाल्यातूनच ही भाजी बनवतात. अशी मिक्स भाजी बनवताना अनेकांना प्रश्न पडत असतीलच की भोगीची भाजी कशी करायची ?
तर माझी ही रेसिपीज मराठीत पाहिली तर आपसूकूच या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळेल. 
ही भाजी जितकी बनविण्यास सोपी आहे. तितकीच खाण्यास पण उत्तम चवदार आणी चविष्ट लागते.मग काही गृहिणी ना भोगीची भाजी दाखवा?
असाही प्रश्न पडत असतीलच
                          भोगीची भाजी बनवण्याची रेसिपीज आपण पाहणार आहोत? Bhogichi bhaji ingredians 
त्यासाठीच घरातील साहित्य कोणकोणते घेणार आहोत ते पाहणार आहोत?Bhogichi bhaji ingredians in marathi 

साहित्य | Indgrendent ⬇️

1 ) मध्यम आकाराचे वांगे 
2 ) अर्धी वाटी ओले सोललेले वाटाणे
3 ) अर्धी वाटी ओले सोललेले पावटे
4 ) अर्धी वाटी ओला हरभरा
5 ) अर्धी वाटी मटार, वाटाणा
6 ) 2 चिरलेले गाजर 
7 ) 1मध्यम आकाराचा बटाटा
8 )अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे
9 ) अर्धी वाटी ओले तूर
10 ) 1मोठा कांदा चिरलेला
11)1/2 चमचा हळद
12) 1चमचा लाल तिखट 
13 )2 चमचे घरचा मिस्क मसाला
14 ) 2चमचा शेंगदाण्याचे कूट 
15 ) 3 चमचे खोबरेचा खिस 
16 ) ९ लसूण ठेचून घेतलेला
17 ) 2 इंच आले खिसलेले
18 ) 2चमचे गरम मसाले
19 ) 1 चमचा जीरे
20 ) चिरलेली कोथिंबीर 
21 ) तेल 1मोठा चमचा
22 ) मीठ चवीनुसार 
23) पाणी आवश्यकतेनुसार

भोगीच्या भाजीसाठी घरातील साहित्य वापरून आपण भोगीची भाजी कशी करतात? कशी बनवतात? किंवा भोगीची भाजी कशी करावी? ते पाहणार आहोत. 

How To make Bhogichi bhaji recipe

भोगीच्या दिवशी ही भोगीची भाजी सर्वजण तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते.
या दिवशी बाजरीच्या भाकरीला आणी तीळाला खूप महत्त्व आहेच. 
संक्रांत येते जानेवारीत.या महिन्यात हवेत खूप गारठा पसरलेला असतो.आणी थंडीही वाढलेली असते.
त्यामुळेच अशावेळेस तीळ खाणे खूप महत्त्वाचे आहे.
कारण तीळा मधे उष्णतामान भरपूर आहे.जे शरीरासाठी अत्यावश्यक आणी फायदेशीर आहेत. 
त्यामुळेच बहुतेक करुन थंडीत तीळ खाण्याची प्रथा आहे.की ज्यामुळे शरीरात उष्णतामान निर्माण होऊ लागतात. 
तसेच बाजरी ही सुध्दा उष्णच आहे.
म्हणूनच की काय थंड वातावरणात शरीराचे थंडी पासून संरक्षण व्हावे आणी शरीरात उष्णतामान निर्माण होईल. ह्या हेतूने जानेवारीत महिन्यात किंवा थंडीच्या दिवसात तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाण्याची प्रथा असावी किंवा आहेत. अशा या मिक्स भोगीच्या भाजी बरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते.
बाजरीची भाकरी आणी भोगीची भाजी उत्तमच लागते.
या दिवशीच या भाजीचा मान असतो.पण इतरही वेळेस अशी मिक्स भाजी चपाती सोबत आणी पांढऱ्याशुभ्र भाता सोबत खाल्ली जातात. 
bhogichi bhaji recipe in marathi आम्ही दिलेल्या या ब्लाॅग पोस्ट मराठी मधे काही माहित सुचवावेत वाटल्यास खाली दिलेल्या कमेंट बाॅक्स मधे कळवा.
आम्ही त्या सुचना पुढच्या ब्लाॅग मधे update करु .
मित्रानो तुम्हाला ही bhogichi bhaji recipe in marathi मधे आवडली तर तुम्ही तुमच्या Friends मधे shear करा.

हे ही वाचा ⬇️

how to make bhogichi bhaji recipe 

भोगीची भाजी बनवण्याची रेसिपीज 
भोगीची भाजी कशी बनते याची पुर्व तयारी ⬇️
प्रथम सर्व शेंग भाज्या सोलून दाणे काढून घ्यावेत. जसे की 
1 ) वाटाणे सोलून अर्धी वाटी दाणे काढून घ्यावेत. 
2 ) पावटेच्या शेंगा सोलुन अर्धी वाटी दाणे काढून घ्यावेत. 
3 ) ओला हरभरा अर्धी वाटी दाणे काढून घ्यावेत. 
4 ) 1 मध्यम आकाराचे वांगे चिरून पाण्यात भिजत ठेवावेत काळे पडू नये म्हणून. 
5 ) मध्यम आकाराचा बटाटा चिरून घ्यावेत आणी पाण्यात भिजत ठेवावेत. 
6 ) ओले तूरीच्या शेंगा सोलुन अर्धी वाटी दाणे काढून घ्यावेत. 
7 ) 1मोठा कांदा चिरुन घ्यावेत 
8 ) शेंगदाण्याचे कूट करून घ्यावेत. 
9 ) 3 चमचे सुक्या खोबरेची खिस,8पाकळ्या लसूण, 1इंच आल ,थोडीशी कोथिंबीर मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत. 
10 ) कोथिंबीर चिरून घ्यावेत. 
11 ) गाजर चिरून घ्यावेत 

कृती | Method ⬇️ 

1 ) प्रथम सर्व चिरून ठेवलेल्या भाज्या एकत्र करुन स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावेत. 
2 ) आता गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करायला ठेवावेत. 
कढई तापल्यावर त्यात एक मोठा चमचा तेल घाला.तेल तापल्यावर त्यात चिरून ठेवलेला कांदा घाला.नंतर कढीपत्ता घाला.
कांदा लाल होई पर्यंत भाजून घ्यावेत. 
नंतर मोहरी घाला.मोहरी तडतडल्यावर जीरे घाला.नंतर 1/2 चमचा हळद घाला.नंतर मिक्सरला वाटलेला मसाला घालून परतून घ्यावेत. मसाले परतून झाल्यावर त्यात सर्व धुवून घेतलेल्या भाज्या टाका.अज़ून एकदा परतून घ्यावेत. 
नंतर 1चमचा लाल तिखट, 2चमचा गरम मसाले,2 चमचा घरचा मिस्क मसाला,2चमचे शेंगदाण्याचे कूट घालून परतून घ्यावेत.शेवटी चवीनुसार मीठ घालावेत. 
आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावेत. 
15मीनीटानी भाजी शिजली ते चेक करावी.
वाटाणा,पावटा,बटाटा या पैकी एक चमच्यात घेऊन हातानेच सहज दाबले गेले तर आपली भाजी शिजली आहे .असे समजा.
अशा तर्‍हेन खाण्यास तयार आहेत भोगीची भाजी.

People also Search for ⬇️

1 ) Bhogichi Bhaji Ingredients 
2 ) Bhogichi Bhaji Recipe in Marathi 
3 ) Bhogichi Bhaji Ingredients In Marathi 
4 ) Mughachi Bhaji 

Keywords using this blog ⬇️

भोगीची भाजी,भोगीची भाजी रेसिपी,भोगीची मिक्स भाजी,मकरसंक्रांति भोगीची भाजी,शेंगसोला भोगीची भाजी,भोगीची भाजी भाकरी,भोगीची भाजी रेसिपी मराठी,महाराष्ट्रियन भोगीची भाजी,भोगीची भाजी व तिळाची भाकरी,भोगीची भाजी कशी करावी,भोगीची भाजी कशी बनवायची,अस्सल सातारी भोगीची भाजी,भोगीची भाजी रेसीपी मराठी,संक्रांत स्पेशल भोगीची भाजी,लेकुरवाळी भाजी,भोगी ची भाजी,संक्रांतीची भाजी,चमचमीत भोगीची भाजी,भोगीची भाजी वैशालीज रेसिपी,बाजरीची भाकरी,मकरसंक्रांतीची भोगीची भाजी #bharangichibhaji #bhogichibhajirecipemarathi

Recipes Blogs Post Marathi ⬇️रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज ब्लाॅग पोस्ट मराठीत लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/07/fasting-recipe.html

झटपट बनवा पाथरीची भाजी ब्लाॅग पोस्ट मराठीत लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/07/how-to-make-pathari-chi-ranbhajhi.html
पावसाळ्यातील रानभाजी शेवळे रेसिपीज ब्लाॅग पोस्ट मराठीत लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/07/ranbhaji-recipes-shevala.html
पारंपारिक पध्दतीत चवळीची उसळ रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-chavalichi-usal-recipes.html
सातारी चव असलेला पावटेभात ब्लाॅग पोस्ट मराठीत लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/08/authentic-how-make-pavte-pawate-bhat.html

Youtube Recipes chanl Link⬇️ ⬇️https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1

Fecebook Link ⬇️ 
@nandakarande111.blogspot.com
धन्यवाद, 
Thank you so much. 




लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ