!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : फक्त ३साहित्यात बनवा उपवासाचा राजगीरा पिठाचा कुरकुरीत जाळीदार डोसा|Instant Rajgira dosa|How to make Fasting dosa

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

फक्त ३साहित्यात बनवा उपवासाचा राजगीरा पिठाचा कुरकुरीत जाळीदार डोसा|Instant Rajgira dosa|How to make Fasting dosa

 फक्त ३साहित्यात बनवा उपवासाचा राजगीरा पिठाचा कुरकुरीत जाळीदार डोसा|Instant Rajgira dosa|How to make Fasting dosa



                                      आपल्या भारतातील महाराष्ट्रीयन संस्कृतीत सणवार आणी उपासतापासाला अनन्य साधारण महत्त्व आहेच. 
सणवार आला आपण उपवास पकडतो.
देवांचा वार आला धरा उपवास, संकष्टीचा उपवास, अंगारकी चा उपवास.
महाशिवरात्र आली धरा उपवास, श्रावण आला,नवरात्रीचे नऊ दिवस उपवास, 
असे एकना अनेक आपल्या भारतीय संस्कृतीत उपवास असतात.
अशी उपवासाची परंपरा जपताना आपण आहारा कडे पण लक्ष दिले गेले पाहिजे.
उपवास असताना काय खावे,काय खाऊ नये,किती प्रमाणात खावे.
हे ही पाहिले गेले पाहिजेत. 
हे जर पाहिले गेले नाहीतर शरीरास खूप त्रास होऊ शकतो.
जसे की उल्टी होणे,मळमळणे,चक्कर येणे,ढेकर येणे,ॲसिडिटी होणे.
असे अनेक त्रास शरीराला होत असतात. 
शिवाय नवरात्र म्हटल की काहीजणांचे नऊ दिवस उपवास असतात. 
तर काहीजणांचे उठता बसता असे उपवास असतात. 
मग उपवासाचा फराळ करताना फराळ खाण्याचे पण नियोजन केले गेले तर.
असे शरीराला होणारे त्रास कमी प्रमाणात होतील. 
आणी उपवास घडल्याचाही मनाला होणारा आनंदही व्दिगुणीत होईल. 
मग कितीही उपवास धरले तरीही 
शरीराला उपवासाचा थकवा जाणवणार नाही, किंवा
शरीराला होणारा त्रास ही होणार नाहीत. कसे!
                                        त्याहून मस्तच म्हणजे उपवासात जर पोटभरीचा नास्ता असेल तर काय होईल.?
 मग काय तर मज्जाच!
सगळेच उपवास धरायला सहज सोपे जातील. 
कसलाही थकवा जाणवणार नाही किंवा ना चक्कर येणे ना मळमळ जाणवणार नाही.
मी आज तुम्हाला असाच एक उपवासाचा पोटभरीचा नाष्टा सांगणार आहे.
फक्त ३ साहित्य वापरून आपण उपवासाचा नाश्ता सांगणार आहोत. 









ते ही Instant Fasting recipe.

उपवासाच्या दिवशीही शरीराला भरपूर पोषणमूल्य देणाऱ्या पदार्थाचे सेवन करू शकतात. 
नेहमी प्रमाणेच उपवासाच्या वेळेस साबुदाणा खिचडी.
वरईचा भात मेदू वडा,खाऊन कंटाळा आलेला असतो.
ज्याचा नियमित उपवास असतात 
तसेच उपवास म्हटल की सारखी सारखी भूक लागते 
मग काहितरी पोटभरीचे आणी दमदार खाणे असलेच तर उपवासात अशक्तपणा जाणवणार नाही. 
                           त्यासाठीच राजगीरा आहारात नियमित समावेश असणे अतीशय आवश्यक आहेत. 
"राजगीरा" ला धरतीवरील "अमृत" म्हणतात. 
राजगीराला ग्रीक मधे "अमर" असे म्हणतात. 
कारण शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगीरा पदार्थत आहे.
राजगीराला हिंदीत रामदाणा किंवा अमरदाणा असेही म्हणतात. 
उपवासाचे दिवशी रामाचे स्मरण व्हावे म्हणून हिंदीत रामदाणा म्हणतात. 
उपवास आणी राजगिरा यांचे घट्ट नाते आहे.
उपवासात पोटात कमी अन्न गेल्यामुळे शरीराला थकवा,मरगळ,आणी अशक्त पणा जाणवू लागते.
त्यामुळेच उपवासात आहारात राजगीराचा समावेश असेल तर शरीरातील मरगळ.थकवा दूर होईल. 
आणी शरीरही तंदुरुस्त राहील. 

राजगीरा पासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते पाहू या :--

राजगीरा पासून लाडू बनवतात हे सर्वानाच माहीत असेल.
 आणी आपणही बर्‍याच वेळेस राजगीराचे लाडू खालेलेही असेल. 
तसेच राजगीराचे पराठे राजगीराचे चिक्की,राजगीराचे उपमा.
राजगीराचे खिर,असे आणखीन पदार्थ राजगीरा पासून बनवतात.
राजगीराचे लाह्या,तसेच राजगीराचें थालीपीठ, राजगीरा शिरा. 
असे अनेक प्रकारचे पदार्थ राजगीरा पासून बनवलेले आपण पाहतो.
आणी केव्हातरी कधीतरी खालेलेही असणार. 

हे ही वाचा :--

राजगीराचे आहाराचे महत्त्व :--

राजगीराचे आहारात खूप महत्त्वाचे स्थान आहे.
राजगीरात भरपूर कॅल्शियम असल्यामुळेच शरीरातील हाडांना बळकटी येते.
रागगीरा हळूहळू पचतो. त्यामुळेच भूक लागत नाही.
तसेच वजनावर नियंत्रण येउन वजन होउ लागते.
राजगीरात प्रोटिन्सचे प्रमाण असते.
राजगीरात कॅल्शियम अधिक मात्रेत अआहे.
त्यामुळेच सांधेदुखी आणी हाडांचे रोग असलेल्यांना राजगीरा खूप फायदेशीर आहेत 
मधुमेहीच्या रुग्णांना राजगीरा खूप लाभदायक आहे.
राजगीरात भरपूर फायबर आहे.त्यामुळेच शौचास साफ होते.
त्यामुळे मलावरोध होत नाही. आणी बद्धकोष्ठता होत नाहीत. 
हदयाचे स्वास्थ पण चांगले राहते. 
कारण राजगीरात भरपूर फायबर असल्यामुळेच रक्तवाहिन्यांची कार्य सुरळीत चालते.

आज आपण राजगीरा पिठाचा डोसा बनवणार आहोत |

how to make rajgira flour dosa recipe in marathi. 

 त्यासाठी कोणते साहित्य घेतले ते पाहणार आहोत.

 साहित्य | Indgrendent :--

१ वाटी राजगीरा पिठ | Rajagira flour 
१ वाटी वरईच पीठ |varaichpith
१ वाटी साबुदाणा पिठ | sabudana flour 
१ वाटी दही | curds 
१ चमचा जीरे | cumin seeds-1tspoon 
२ मिरच्या 
मीठ
तेल

राजगीराचे डोसे कसे बनवतात ते पाहणार आहोत. 

Rajgira dose keise banaye.

Rajagira dose kase banavatat.

कृती | Method :--

प्रथम वरई आणी साबुदाण्या मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत. आणी
त्यांचे पिठ करुन घ्यावेत. 
नंतर सर्व पिठ एकत्र करुन घ्यावेत. 
राजगीरा,वरई आणी साबुदाणा पिठ.
हे सर्व पिठ एकत्र केल्या नंतर पिठात दही घाला. 
सर्व मिश्रण मिक्स करुन हलवून घ्यावेत. 
मग त्यात मिरच्या चिरून घालावेत.
नंतर जीरे घाला.
नंतर आणी हलवून घ्यावेत. 
झाकण ठेवून १५ मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवा.
१५ मिनिटां नंतर गॅसवर पॅन ठेवावेत.
 पॅन गरम झाल्यावर पॅनला थोडे तेल लावून डोसे टाकून घ्यावेत. 
अशा तर्‍हेन सर्व डोसे करुन घ्यावेत. 
दही बरोबर खाण्यास द्यावेत. 
अशा तर्‍हेन खाण्यास तयार आहेत राजगीरा डोसे.

Blog post :--⬇️ Read and enjoy this post :--

चटपटीत स्विटकाॅन चाट रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
उकडीचे तांदळाचे मोदक रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
साबुदाण्याची खिचडी मराठी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचा :--
कुरकुरीत रवा डोसा रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचा :--
सातारी चवीचा पावटे भात रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट पहा :--

Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️ 

Fecebook Link ⬇️ https://www.facebook.com/nanda.karande.77


Instagram link ⬇️  :--

https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=

Youtube channel pleylist Link ⬇️ :--


#navratri #navratrispecial #india #durgapuja #mumbai #jaimatadi #durga #festival #maadurga #durgamaa #indianfestival #indian
@नंदा कारंडे रेसिपीज ब्लाॅग पोस्ट 


























                                     

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ