झटपट बनवा पाथरीची रानभाजी | How To Make Pathari chi Ranbhajhi
औषधी गुणधर्म असलेली पाथरीची रानभाजी.
कॅल्शियमयुक्त पातरीची रानभाजी.
मुगडाळ घालून बनवा पाथरीची रानभाजी.
म्हणूनच रानातली,शेतातील भाजी खायला खूप छान लागते
रानात काम करणारे बायका ही भाजी भाकरी बरोबर
घेऊन अशीच कोरडी पण खातात
https://youtu.be/mn87AvKgTbQ
एवढीही चवदार भाजी खायला खूप छान लागते
सवाॅना भाजी ची ओळख करून द्यायची म्हणून मी
आज पाथरी ची भाजी ची रेसिपी दाखवणारआहे
काही भाज्या तर औषध म्हणून आहारात समावेश करण्यात येतो.
तसेच पाथरीची भाजी ची पानेही ब्लेड ने कापल्या सारखी लांब पाने या भाजी ला असतात.
अशी या भाजीची ओळख असते. आरोग्याच्या दृष्टीने अशा आयुर्वेदीक भाज्या तांदुळजा, कामात,तरवटा,
कुरडू,घोळ,पालक,पाथरी या रानभाज्याची शहरी लोकांना ओळख निर्माण व्हावी म्हणून कृषीतज्ज्ञा कडूनच रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
पातरीची भाजी शेतात जमिनीला लागूनच उगवते.
काढून घेतल्यानंतर परत परत उगवते.
ही आयुर्वेदीक भाजी असल्यामुळेच ही भाजी खूप औषधी आहे.या भाजीत भरपूर कॅल्शियम असल्यामुळेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होते.
म्हणून ही भाजी लहान मुलांना खाण्यास द्यावी.
गुरांना चारा म्हणूनही भाजी देतात.
शेतकरी कच्ची सुध्दा ही भाजी खातात.
हे ही वाचा :--⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/07/fasting-recipe.html
गावाकडे शेतात सर्व प्रकारची रानभाजी आपोआपच उगवत असते.
पण आपल्या शहरी लोकांना ओळख ता येत नाहीत.
फक्त गावातील लोक, गावकरी आणी आदिवासीं रानावनात जाउन
फिरतात. त्यांनाच अशा भाज्यांची माहीती असते.
रानभाज्या मुळे मानवी शरीराची गरज भागवली जाते.
रानभाजी शेतात,रानात,जंगलात किंवा निसर्गात आपोआप उगवतात.
अशा सहजपणे उगवणारया भाज्यावर ना.कोणते कीटकनाशक असते.
ना कोणते रासायनिक खताचे पदार्थ असते.
त्यामुळेच अशा भाज्यामधे खूप अस्सल पणा असतो.
त्यामुळे पावसाळ्यात येणारी रानातील भाजीत व्हिटॅमिन्स ने भरपूर खनिज, कॅल्शियम युक्त अस्सल असतात.
म्हणूनच गावाकडे सर्वच भाज्यांचा आहारात समावेश असतो.
त्यामुळेच गावाकडील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच असते.
आहारात पालेभाजी, फळभाज्या,कंदमूळ याचां समावेश असेल तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तींची वाढ होते.
आरोग्यवर्धक, आरोग्यदायी पाथरीची रानभाजी.
पावसाळ्यातील नैसर्गिकरित्या उगवणारा या भाज्या यांचे औषधी उपयोग अनेक आहेत. सध्याच्या पिढीला या रानभाज्याचे नावेही माहीत नाहीत आणी त्यांचे औषधी उपयोगही माहीत नाहीत. त्यामुळेच कृषीतज्ज्ञ वर्षा वर्षाला रानभाज्याचे महोत्सवाचे आयोजित करण्यात येतो.
साहित्य:--
रानातील पाथरीची भाजी
१/२ वाटी मुगडाळ भिजवलेली
४ हिरव्या मिरच्या
७ त ८ लसूण पाकळ्या
१ चमचा जिरे
मीठ
तेल
कृती :--
प्रथम पाथरी ही रानभाजी असल्यामुळे ३ ते ४ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.
पाणी निथळून गेल्यावर भाजी बारीक चिरून घ्यावेत.
आता भाजीला फोडणी देउ.कढई तापल्यावर तेल टाका.लसूण ठेचून घ्यावेत. मिरच्या चिरून घ्यावेत आणी दोन्ही तेलात परतून घ्यावेत.
१ चमचा जीरे टाका.आणी परतून घ्यावेत
लसूण आणी मिरच्या थोडस लाल झाल्यावर चिरून ठेवलेली भाजी टाका.भिजवलेली मुगडाळ घाला आणी
झाकण ठेवा.एक वाफ येऊ द्यात.
५मिनीटात झाकण काढून मीठ चवीनुसार घालून परतून घ्यावेत मग परत झाकण ठेवा. भाजीला पाणी सुटल की त्याच पाण्यात मुगडाळ अर्धकच्ची शिजवून घ्यावेत.
भाजीतील सर्व पाणी आटवून घ्यावेत.
अशा प्रकारे भाजी शिजवून घ्यावेत.
आणी खाण्यास तयार आहेत पाथरीची भाजी.
Youtube channel Recipes Video ⬇️ please Like and subscribe Link ⬇️
चिंचेची चटणी रेसिपीज| पाणीपुरी चाट साठी लागणारी
https://youtu.be/M0YrGW1mmwY
खरडा चिकन रेसिपीज ⬇️
https://youtu.be/yXx89Hit7KU
लाल माठाची भाजी रेसिपीज ⬇️
https://youtu.be/iLnxNx1V8zY
पुदिना चटणी रेसिपीज ⬇️
https://youtu.be/W7RcgGE0Ir8
वरईच्या तांदूळाची मँगो खिर ⬇️
https://youtu.be/vSmaoX4fExE
youtube channel Like and subscribe Link ⬇️
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
Fecebook Link ⬇️ please follow me ⬇️
https://www.facebook.com/nanda.karande.77
Instagram Link ⬇️ please Like 👍
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️ please Like
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचून आवडल्यास लाईक करा.शेअर
करा.चाईनल ला सबस्क्राईब करा
लेबल: झटपट बनवा पाथरीची रानभाजी | How To Make Pathari chi Ranbhajhi.








0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ