!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक|Tandalache uakdiche Modak|How To Make Rice steamed Modak

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक|Tandalache uakdiche Modak|How To Make Rice steamed Modak

तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक|Tandalache uakdiche Modak|How To Make Rice steamed Modak

  #मोदकरेसिपीमराठी #Tandalacheukadichemodak #foodbloggar #Modak 
                                  गणेश चतुर्थी स्पेशल विशेष ऊकडीचे मोदक.
गणपती बाप्पा स्पेशल ukadiche modak recipe marathi bloge. 
तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवतात 
तांदूळाचे उकडीचे मोदक रेसिपीज Full Video ⬆️ Youtube channel वर पहा
आणी आतील Stuffing कसे बनवतात त्याची रेसिपीज मराठीत पाहणार आहोत   
आपल्या भारतीय संस्कृतीत सणवार ला खूप महत्त्व आहेच. 
त्यात महाराष्ट्रीयन पारंपारिक पध्दतीतील सणवार साजरे करण्याची फार पूर्वीपासून प्रथा आहे.
 त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत सण साजरे केले जातात. 
शिवाय भारतीय सण कुठलाही गोडधोड पदार्थ केल्या शिवाय पुर्ण होत नाही.
तसेच नैवेद्य म्हणून गोडधोडाचा देवाला भोग दाखवावाच लागतो.
गणेशोत्सव हा भारतातला सर्वात मोठा सण.
त्यामुळे गणपतीला मोदक प्रिय आहेत. 
म्हणूनच मोदक हा भोग म्हणून हा पदार्थ असतोच.         
गणपती बाप्पा येण्याची चाहूल लागताच. 
घराघरात मोदकाचे साहित्य आणली जातात. 
मोदकाच्या साहित्याने दुकाने पण भरलेली असतात.
मिठाई च्या दुकानात आणी हलवाई च्या दुकानात मिठाई पण मोदकाची असते.
वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे पदार्थ बनवलेले असतात. 
वेगवेगळे फ्लेवर्सचे मोदक असतात. 
त्याचा सुंगंध सगळीकडे दरवळत असतो.
हे सर्व पाहून बाजारात गेल्यावर चैतन्य निर्माण होऊ लागतात. 
                                 आपल्या भारतीय संस्कृतीत सण आणी ऊत्सव यांना फार पूर्वीपासून महत्त्वाचेच स्थान आहे.
प्रत्येक सणवार असेल तर जसे उपासतापास केले जातात. 
तसेच देवाला दाखवायला नैवेद्यही केले जातात. आणी नैवेद्य दाखवतात 
त्यातल्यात्यात गणपती येणार आहेत. 
म्हणूनच आपण सर्वांनाच खूप आनंद होतो. 
सर्व जण जय्यत तयारीस लागलेले असतात. 
मोठी मोठी मंडळे, घराघरातील गणेशोत्सव, त्यांची सजावट करण्यात सज्ज असतात. 
ही सर्व तयारी पूर्ण करून झाल्यावर 
मग तयारी असते ती गणपतीच्या नैवेद्याची. 
मग कोणी तांदळाचे मोदक बनवतात. 
त्यासाठी सुवासिक तांदूळ धुवून,वाळवून दळून आणतात. 
तर कोणी मिक्सर मधून फिरवून तांदूळाची पिठ बनवतात. 
तर कोणी बाजारातून विकतचे आयते मोदक आणतात. 
एकूणच काय गणपती बाप्पाचा प्रसाद.
महत्त्वाचाच प्रसाद नैवेद्याला मोदक ठेवतात. 
गणपती बाप्पाला आवडणारे प्रिय मोदक म्हणजेच बाप्पाचा प्रसाद. 
प्रथम गणपतीचा नैवेद्याचा मान म्हणजेच मोदक. 
गणपतीला प्रिय असलेले मोदक हा गणपतीचा महाप्रसाद असतो.
म्हणूनच मोदकाला खूप सारे महत्त्व आहेच. 
                          मोदक बनवण्याचे खूप प्रकार आहेत. 
नेहमी प्रमाणेच तांदळाचे ऊकडीचे मोदक. मावा मोदक, मँगो मोदक.
चाॅकलेटचे विविध प्रकाराने केलेले मोदक,काजू मोदक, पोहे मोदक.
गव्हाच्या पिठाचे मोदक, तळणीचे मोदक, मैद्याचे मोदक.
 असे विविध आणी अनेक प्रकारचे मोदक बनवण्याची रेलचेलच असते जणू.
गणेश उत्सवात काही ठिकाणी मोदक बनवण्याची स्पर्धाच असते.
तर काही ठिकाणी मोदक खाण्याची स्पर्धा असते.
गणेश चतुर्थी पासून ते गणेश विसर्जना पर्यंत मोदक बनवण्याची रेलचेलच असते.
 तशीच खाण्याची सुध्दा भरपूर प्रमाणात रेलचेल असते.
बाजारात पण विविध पदार्थाचे मोदक पाहून सर्वाचे डोळे दिपून जातात.
पेढ्या सारखे मोदक, चांदीचे वर्ख लावलेले मोदक.
असे एक ना अनेक प्रकारातले मोदकाने हलवायचे किंवा मिठाई दुकान रोषणाई नटलेले असते.
गणेशोत्सवात मिठाई दुकानात तर मोदकाचे विविध प्रकारचे पदार्थ पहावयास मिळतात. 
      ज्याच्या घरी गणपती बसलेला असतो.
त्यांच्या घरी बाप्पाचा प्रसाद म्हणून तांदळाचा मोदक नैवेद्य म्हणून दाखवतात.
तसेच घराघरात मोदक बनवले जातात.       












           

                            गणेश चतुर्थी विशेष नेवैद्य.

तांदळाचे पिठाचे उकडीचे मोदक रेसिपीज.

 आज आपण  उकडीचे मोदक बनवणार आहोत. 
आतील स्टफिंग सारण कसे बनवतात  
ते ही आपण पाहणार आहोत. 
चला तर मग रेसिपीज कडे वळूयात.

प्रथम साहित्यासाठी कोणते पदार्थ लागतात.

 ते आपण पाहणार आहोत.

हे ही वाचा :--

    साहित्य | Indgrendent :--

उकड काढण्यासाठीच 

1 Cup - तांदळाचे पिठ | Rice flour 
1Cup - पाणी | water
1/2 tspoo - मीठ | salt 
1tspoon - तूप | Ghee 

सारण | Stuffing :--

2 tbspoon तूप 

2 bowl किसलेले खोबरे | Greated Coconut 

1 bowl किसलेला गूळ | Jaggery

1/2 tspoon वेलचीपूड | Cardamom powder 
1/2 tspoon खसखस | Poppy Seeds
2 tspoon बारीक चिरलेले काजू बदाम|Chopped dry fruits { optional }

कृती | Method :--


 १ ) प्रथम आपण तांदूळची उकड काढून घ्यावेत
त्यासाठीच एक कढई गॅसवर ठेवून घ्यावेत. 
कढई तापल्यावर त्यात १ कप पाणी घाला. 
पाण्याला उकळी येऊ लागल्यावर त्यात १/२ चमचा मीठ घाला.
१ चमचा तूप घालून गॅस बंद करा.
आता त्यात १ कप तांदूळाचे पिठ घाला.
आता पटापट सर्व मिश्रण एकत्र करुन हलवून घ्या.
आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावेत. 
कमीत कमी १५ मिनीटे तरी झाकण लावून ठेवा.
पिठ थोड थंड झाल्यावर एका परातीत घ्या.
 एका वाटीने दाबून दाबून गरमागरम असतानाच नरम होई पर्यंत मळून घ्यावेत. 
थोडं फार हाताला गरम पाण्याचा हात लावून नरम होई पर्यंत पिठ मळून घ्यावेत. 
मळलेला पिठाचा गोळा ओल्या कापडाखाली ठेवा.
२ ) आता आपण सारण बनवुन घेऊ
त्यासाठी गॅसवर कढई मध्यम आचेवर तापवत ठेवा.
कढई तापल्यावर त्यात २ चमचे तूप घाला.
तूप वितळल्यावर त्यात खवलेले किंवा किसलेले खोबरे घाला.
खोबरे तुपात थोडेसेच परतून घ्यावेत. 
आता चिरलेला गूळ घाला.
वेलचीपूड घाला.
ड्रायफ्रुट असेल तरच घाला.
सर्व मिश्रण एकत्र करुन हलवून घ्यावेत. 
मिश्रण हलवून घेताना तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यावेत. 
आता मोदक करायला घ्यावेत. 
३ ) तांदळाच्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन हातानेच पुरी सारखे गोल आकार द्या.
किंवा पोळपाटावर लाटून घ्यावेत.
मग त्या आकाराला चुण्या द्या.
आतमधे १ चमचा सारण भरून सर्व चुण्या एकत्र करुन मोदकाचा आकार द्या.
अशाप्रकारे सर्व मोदक करुन घ्यावेत. 
आता एका पातेल्यात पाणी घालून उकळायला ठेवा.
पाणी उकळल्यावर त्याच पातेल्यात 
चाळणीला तेल लावून ठेवा.
किंवा त्यात एखादा रुमाल टाकून ठेवा.
नंतर एक एक मोदक ठेवून वाफेवर १० ते १५ मिनीटे वाफवून घ्यावेत. 
किंवा उकडून घ्यावेत. 
तयार आहेत गरमागरम गणपती बाप्पाच्या प्रसादाचे तांदळाचे उकडीचे मोदक.
खाण्यास देताना मोदकावर चमच्या भर तुपाची धार सोडून खाण्यास द्यावी.

टिप्स :--

1 ) तांदूळाची उकड काढताना पाण्याचे प्रमाण सम समान ठेवावे
पाणी कमी जास्त झाल्यास उकड बिघडू शकते.
2 ) पाण्यात १ चमचाभर तुप किंवा तेल टाका.
उकड स्वाप्ट आणि मऊलुसलुशीत मोदक होतात 
३ ) सारण करताना कढई तापल्यावर १ चमचा तुप किंवा तेल टाका.
सारणातील गूळ घट्ट झाल्यावर कढईच्या तळाला चिकटणार नाही.
त्यामुळे गूळ करपणार नाही.
Youtube Recipes Video Link ⬇️ 
पांढरेशुभ्र मऊलुसलुशीत तांदूळाचे मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/U5mvCHab9m0
पौष्टिक डिंकाचे मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/0I3mwla_HIY
खजूर ड्रायफ्रुट मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/xFtPFhN3eEU
रव्याचा टुटीफ्रुट मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/QfIgYY2xnCg
चाॅकलेट मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/oiWhJkx2Vlk
तांदळाचे उकडीचे मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/ONzqilTH0p8
मावा मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/Xb3kHxF_bcM
काजू मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/1fUSgD17Sag
गव्हाच्या पिठाचे मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/kY8lNbztdhM
Youtube Channel Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️ 
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
Fecebook Link ⬇️ Follow me 
https://www.facebook.com/nanda.karande.77
http://fb.com/stars
Instagram Link ⬇️ 
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️ 
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
Websait Link ⬇️ please Like and subscribe Link ⬇️ 
https://nandakarande111.blogspot.com
https://recipenanda.com
Playlist Link ⬇️ please, Like and subscribe Link ⬇️ 
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g
@नंदा कारंडे रेसिपीज ब्लाॅग पोस्ट 



लेबल: