!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : साबुदाण्याची खिचडी|Farali recipes|Sabudana Khichdi|How To Make sabudana khichdi

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

साबुदाण्याची खिचडी|Farali recipes|Sabudana Khichdi|How To Make sabudana khichdi

 साबुदाण्याची खिचडी|Farali recipes|Sabudana Khichdi|How To Make sabudana khichdi


        साबुदाणा खिचडी रेसिपीज Youtube video 
साबुदाण्याची खिचडी.खास करून उपवासात बनवतात. 
महाराष्ट्रीयन पध्दतीतील उपवासाचे खाद्यपदार्थ. 
महाराष्ट्रात अनेक व्रत वैक्यल्य, उपासतापास केले जातात. 
जसे देवदेवतांचे वार असतात तसतसे उपास असतात.
मग एखादा सणवार असेल तरही उपवास असतो.
महाशिवरात्र आली की बहुतेकांचा उपवास असतात. 
श्रावणात तर काहीजणांचे एक एक महिना उपवास असतो.
रोज संध्याकाळी उपवास सोडतात. 
तसेच नवरात्र आली काहीजणांचे नऊ दिवस उपवास.
मग काय उपवासा साठी खास पदार्थ म्हणजेच साबुदाण्याची खिचडी.
साबुदाण्याची खिचडी खाउन अनेक जणांचा उपवास असतो.
साबुदाण्याची खिचडी उपवासात काहीजण सकाळी नाष्टा करतात तर काहीजण दुपारी खिचडी खातात.
उपवास म्हटलं की फराळाला काय काय करावे.हा प्रश्न सर्वानाच पडलेला असतो.
फराळा साठी साबुदाणा खिचडी खाणे ही अतिउत्तम आहे.
कारण साबुदाण्याची खिचडी खाल्याने पोट भरते.आणी दिवसभर पोट भरल्यासारखे राहते.
त्यामुळेच दिवसभर शरीर ताजेतवाने राहते. 
त्यामुळेच उपवासात सर्व जण साबुदाण्याची खिचडी खाण्यावर भर देतात.
महिन्याची एकादशीनिमित्त साबुदाण्याची खिचडी बनवतात. 
तसेच आषाढी-कार्तिकी एकादशीच्या दिवशी घराघरात साबुदाण्याची खिचडी बनवली जाते.
शिवाय महाशिवरात्रीनिमित्त बहुतेक शंकराच्या देवळात साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप प्रसाद म्हणून केले जाते.
तसेच नऊ दिवसाचे उपवासात दिवसभरातून एका वेळेस तरी साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते.

हे ही वाचा  :--

https://nandakarande111.blogspot.com/2023/07/how-to-make-ranbhajhi-kantoli-recipes.htmlhttps://nandakarande111.blogspot.com/2023/07/how-to-make-ranbhajhi-kantoli-recipes.html

Sabudana khichdi recipe :--

साबुदाणा खिचडी जास्तीत जास्त नवरात्रात लोकांचे नऊ दिवस उपवास असतात.
तेव्हा नाष्टाला बनवली जातात.
तर काहीजण दुपारच्याला खिचडी खातात. 
साबुदाणा हे शुध्द आणी सात्विक फळ आहे.
जेव्हा लोक नऊ दिवस नऊ रात्र कठोर उपवास करतात.
तेव्हा त्यांना निरोगी आणी ताजेतवान
 ठेवण्याचे काम साबुदाण्याची खिचडी करते.
उपवासाला मोकळी खमंग साबुदाणा खिचडी कशी बनवतात.
Sabudana Khichdi Recipe in marath
Upvasache recipe in marathi.
Sabudana Khichadi in marathi.
परफेक्ट साबुदाण्याची खिचडी बनवायची पद्धत.

खाबुदाण्याची खिचडी शुध्द आणी सात्विक आहार आहे.

त्यामुळेच साबुदाण्याची खिचडी खाण्याने शरीर आणी मन दोन्हीही 
शुध्द आणी सात्विक राहते.
तसेच दिवसभर शरीर तंदुरुस्त आणी 
ताजेतवान राहते.
उपवासाच्या वेळेस सर्वात जास्त साबुदाणा वापरला जातो.
साबुदाण्या पासून अनेक पाककृती बनवता येतात. 
साबुदाण्याची पराठे बनवता येतात. 
त्याप्रमाणेच साबुदाण्याचा वडा ही बनवला जातो.
आणी आवडीने व चवीचवीने खाल्ला ही जातो.
जशी साबुदाण्याची खीर किंवा लापशी बनवली जाते.
अतिसार झालेल्या रुग्णांना साबुदाण्याची खिर किंवा लापशी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 
बटाटे घातलेली साबुदाणा खिचडी तर फारच उत्तम लागते.
तसेच साबुदाण्याची खिचडीत दही घालुन खाल्ली जाते.मस्तच लागते.
असे एक ना अनेक प्रकारचे पदार्थ आपण साबुदाण्या पासून बनवत असतो.
साबुदाणा आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. 
कारण साबुदाणा खाल्ल्याने किंवा आपल्या आहारात नियमित समावेश असल्यामुळेच आपल्या शरीराला प्रोटिन्स,लोह,कॅल्शियम,फायबर,मॅग्नेशियम, एनर्जी,कार्बोहायड्रेट,झिंक,फाॅस्परस,
पाॅटेशियम,सारखे गुणधर्म असल्यामुळेच शरीराचे अनेक समस्यांचे रक्षण करतात. 
त्यामुळेच आहारात साबुदाण्याचे समावेश करून अतिसारासारख्या समस्या घालवू शकता.
याचमाध्यमातून उपवासाची परंपरा पाळून आपले आरोग्याची काळजी आपणच घ्यायची आहे.
जसे साबुदाणा खाल्याने शरीराला फायदा होतो.
तसाच साबुदाणा अतिखाण्याने सुध्दा 
शरीराला नुकसान होते.

चला तर मग जाणून घेऊ या साबुदाणा अतिखाण्याचे तोटे :--






1}बद्धकोष्ठता :-- 

साबुदाणा अतिखाल्याने दिवसभर पोट भरल्यासारखे राहते.
त्यामुळेच पोटात बद्धकोष्ठताची समस्या उद्बभवू शकते.

2} मधुमेह :--

 जर तुम्ही मधुमेहचे रुग्ण असाल तर साबुदाण्याचे सेवन जरा बेतानेच करा.
म्हणजेच साबुदाण्याचे सेवन जास्त करु नये.
कारण साबूदाण्यामधे कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते.
त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी 
वाढू शकते.

3 } लठ्ठपणा :--

आहारात रोज नियमित साबुदाणा असेल तर शरीराचे वजन वाढू शकेल. 
कारण साबुदाण्यात खूप कॅलरीजचे प्रमाण असल्यामुळेच शरीराचे वजन वाढण्याचे काम करते.

4 } किडनी स्टोन :--

किडनी स्टोनच्या रुग्णांना अनेक पदार्थ खाण्यास डॉक्टर मनाई करतात.
साबुदाण्यात पाॅटेशियमचे प्रमाण अधिक असल्यामुळेच किडनी स्टोनच्या रुग्णांना साबुदाण्याचे सेवन   
करु नये.
त्यामुळेच ही समस्या अधिक होउ शकते.

यासाठी जाणून घेऊया टेस्टी आणी हेल्दी खिचडी कशी तयार करावी.

तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यक आहेत. 
आणी आपण घरात कशी तयार करु शकतो.
त्यामुळेच आज आपण साबुदाण्याची खिचडी घरातील साहित्यातून बनवणार आहोत. 
तर आज आपण साबुदाण्याची खिचडी कसे बनवतात ते पाहणार आहोत.

त्यामुळेच आज आपण साबुदाण्याची खिचडी घरातील साहित्यातून बनवणार आहोत.

तर आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवतात ते पाहणार आहोत.

How To Make Sabudanachi Khichdi 

कृती | Method :--

साहित्य | Indgrendent 

२ वाटी साबुदाणे | 2 bowl sabudana 
४ हिरव्या मिरच्या | 4 green chilli 
२ बटाटे  |  2 potato 
१ चमचा जीरे | cumin seeds-1tspoon 
१ वाटी शेंगदाण्याचे कूट | Penut powder 
४ कडिपत्ताची पाने | kadipatta
मीठ | salt 
तेल | Oil 

कृती | Method :--


आधी बटाटे बारीक चिरून घ्यावेत. 
आणी चिरलेले बटाटे स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावेत.
त्यामुळेच बटाटे काळपट पडत नाहीत. 
मिरच्या बारीक चिरून घ्यावेत. 
आता पुढे 
प्रथम गॅसवर पॅन ठेवावेत. 
पॅन गरम झाल्यावर तेल घाला.
तेल तापल्यावर चिरलेले बटाटे घाला.
मग बटाटे तेलात शिजल्यावर १ चमचा जीरे घाला.
जीरे तडतडल्यावर नंतर कडीपत्ता घाला.
मग चिरून ठेवलेल्या मिरच्या घाला.
मिरच्या तेलात परतून घ्यावेत. 
नंतर भिजवलेला साबुदाणा घाला.
शेंगदाण्याचे कूट घालून परतून घ्यावेत.
नंतर चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावेत. 
झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावेत. 
खाण्यास तयार आहेत साबुदाण्याची खिचडी

टिप्स :--

साबुदाणे कसे भिजवावे ते आपण पाहणार आहोत. 

साबुदाणा भिजवायची पध्दत. 

साबुदाणा आधी धुवून घ्यावेत. 
सर्व पाणी काढून घ्यावेत. 
धुतलेल्या साबुदाण्यात साबुदाण्यापेक्षा १इंच वर पाणी वर ठेवावेत. 
आणी तसेच रात्रभर भिजत घालत साबुदाणा झाकण लावून ठेवा. 
सकाळी साबुदाणा मोकळा होऊन चांगला मऊ झालेला दिसेल.
अशा प्रकारे भिजवलेला साबुदाण्याची खिचडी मऊ लुसलुशीत होते.

Youtube Recipes Video Link ⬇️ 
कुरकुरीत रवा डोसा ब्लाॅग पोस्ट 
https://nandakarande111.blogspot.com/2023/09/how-to-make-instant-sujhi-dosa-recip.html
सातारी चव असलेला पावटेभात ब्लाॅग पोस्ट 
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/authentic-how-make-pavte-pawate-bhat.html
महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण ब्लाॅग पोस्ट 
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-varan-recipe.html
गावरान पध्दतीत झणझणीत झुणका ब्लाॅग पोस्ट 
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-zunka-recipe.html
चमचमीत घोसळ्याची भाजी ब्लाॅग पोस्ट 
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-ghosalyachi-bhajhi-recipe.html
महाराष्ट्रीयन पध्दतीत ताकाची कढी ब्लाॅग पोस्ट 
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-taakachi-kadhi-recipe.html
चवळीची उसळ ब्लाॅग पोस्ट 
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-chavalichi-usal-recipes.html
ज्वारीची भाकरी ब्लाॅग पोस्ट 
https://recipenanda.com/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c-%e0%a4%ae/
Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️ 
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
Fecebook Link ⬇️ please follow me 
https://www.facebook.com/nanda.karande.77
http://fb.com/stars
Instagram Link ⬇️ please,Like 
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️ please Like 
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
Websait Link ⬇️ please, Like and subscribe Link 
https://nandakarande111.blogspot.com
https://recipenanda.com
Playlist Link ⬇️ please Like and subscribe Link 
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g
@नंदा कारंडे रेसिपीज ब्लाॅग 






लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ