अळुवडी रेसिपीज | महाराष्ट्रातील खाद्यपदार्थाची शान अळूवडी| How To Make Aluvadi
#Aluvadirecipi #kurkuritaluvafi कमी साहित्यात झटपट खमंग आणि कुरकुरीत अळूवडी बनवण्याची सोपी पद्धत अळूवडी म्हटल की सर्वानाच्याच तोंडाला पाणी सुटत. अलीकडेच १२ही महीने अळूवडी चा पाने विकत मिळतात. १०रू ५ पाने या प्रमाणात. ज्यांच्या घरी खुप लोक असतील तर अशा लोकांना ३ ते ४ जुड्या घेतल्याच पाहिजेत. बर असो,अशी ही अळूवडी . घेतल्या शिवाय राहवत नाही आणी अळूच्या वड्या करून खाल्या शिवाय बर वाटत नाहीत एकदा मी गावी गेले. घराच्या मागे खुप जागा आहे. सारखी अशी पाने विकत घेण्या पेक्षा आपणच आपल्या जागेवर अळू लावले तर.आणी मग मी तसेच केले. गावाला बहुतेकांचे अळू लावलेले असतात. एक अळूचा गड्डा आणला.आणी आमच्या जागी लावला. २ ते ३ महिन्यात छोटे छोटे अळू आलेले दिसायला लागलेत आणी आजूबाजूलाच खुप सारे पसरलेले दिसले. १अळूच्या गड्यात २० ते २५ अळूची छोटीशी झाडे आलेली दिसली. आहे की नाही गंमत मग कधी मुंबई ला आले ती सोबत अळुचा १ गड्डा घेऊन. इथेही गड्डा लावला कुंडीत ३ ते ४ महिन्यात तोही पसरला कुंडी भर अशीही अळूच्या पानांची कहाणी सांगायच तात्पर्य असे की आज आपण अळूच्या वड्या बनवणार आहोत मी स्वता असे अळू लावल्या मूळे अळू हे दोन प्रकार चे असतात. हे समजले. १ल्या प्रकार चे अळू हे खूप खाजरे असतात जे रस्त्याकडेला आणी डबक्यात मिळतात ते हिरव्या देठाची अळू खूप खाजरे असतात तसेच उलट काळ्या देठाचे अळू खायला उत्तम अशी ओळखण्याची पध्दत आहे. अशी पान आणली की त्यात चिंच किवा चिंचेचा कोळ.घातला जातो २प्रकार म्हणजे मी वर दिलेला प्रकार म्हणजे देशी अळू. हे दोन प्रकाराने अळू मिळतात मुंबई ला सुध्दा वसई ची पाने म्हणून बाजारात विकत मिळतात. ही पाने सुध्दा खाजरी नाहीत. मी स्वत अळू वडी करताना चिंच कधीच वापरली नाही मी नेहमीच अशी देशी पाने घेते.जी घशात खवखवत नाही आणी अशा पानांच्या वड्या बनवते. श्रावणात खुप भाज्या विकायला येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तश्याच बर्याच रानभाज्या ही विकायला आलेले असतात. अळूही पण एक फेमस रानभाजीच आहे. श्रावणात नाॅनवेज खात नाहीत त्याला पर्याय म्हणून अळू च्या वड्या बनवतात. कोणी अळूची भजी बनवतात. तर कोणी भाजी अळूचं फदफद. अशा वेगवेगळ्या प्रकारे अळू खाल्ली जातात. श्रावणात जे लोक मांसाहार करत नाही अशा लोकांना तळलेले पदार्थ काहीतरी हवे असते मग पर्याय म्हणून अळूवड्या श्रावणात केल्या जातात अशी पाने अजीबात खाजरी नसतात. अश्या पानास गावठी पाने असेही म्हणतात. देशी अळूची पाने आकाराने छोटी असतात पन चवीला छान आहेत कश्याही वड्या केल्या तरी छानच लागतात त्यास चिंच गूळ घालत नाहीत प्रत्येक राज्यात प्रत्येक देशात अळूला वेगवेगळ्या नावाने म्हटल जाते. अरवी का पत्ता,कोणी म्हटल जात तर कोणी अरबी का पत्ता म्हणतात गुजरात कडे तर पतरा म्हणतात. अळू वडीला अशी ही अळू ची कहाणी साताजन्मांची संपूर्ण कहाणी संपता संपेना. चला तर मग रेसिपीज ला सुरुवात करुयात. साहित्य :--- १० ते १२ पाने २वाटी बेसन पीठ ४ ते ५ हिरव्या मिरच्या ६ ते ७ लसूण पाकळ्या १ चमचा जीरे १ चमचा हळद १ चमचा.तिळ. मीठ चवीनुसार तेल कृती :--- प्रथम अळुची पाने स्वच्छ पाण्यातून धुवून पुसून घ्यावेत नंतर पानाच्या मागील शिरा आणि काळी देठ कापून घ्या वर दिलेल्या प्रमाणे मिरच्या लसूण जीरे मिक्सर मधून फिरवून घ्यावेत आता २वाटी घेतलेले बेसन पिठात सर्व वाटणाचे मिश्रण पिठात टाका चवीनुसार मीठ टाका मिश्रण भज्याच्या पिठासारखे करा फार पातळ नको. आता अळूचे एक पान घ्या.आणी पान उलटे करा. त्यावर तयार करण्यात आलेले पिठ पसरून पसरून लावावेत नंतर त्यावर आणखी एक परत पाने लावावेत. अशी एकावर एक तीन पाने लावावेत. ४ लावा किंवा ५ लावावेत नंतर रोल करा. अशा प्रकारे रोल करून स्टीम करा. अथवा वाफवून घ्यावेत थंड झाल्यावर कापून वड्या पाडा आणी शाॅलोफ्राय करावेत. खाण्यासाठी तयार आहेत अळूवड्या alu vadi कमी साहित्यात अळू वडी महाराष्टरीण अळू वडी स्पेशल व्हेज थाळी अळू वडी परफेक्ट रेसिपी | Alu Vadi Recipe | Step by Step Aloo Vadi कमी साहित्यात झटपट अाणि खमंग कुरकुरीत अळूवडी बनवण्याची सोपी साधी पद्धत झटपट अळूवडी एक नवीन प्रकार। कुणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत। अळूवडी घरचा स्वाद traditional marathi recipes arbi patra in hindi khamang kurkurit aluvadi indian snack recipe ganpati recipes Indian recipes श्राद्धाची अळू वड्या Pitrupaksh special recipe shravan special recipe indian snacks कुरकुरीत चविष्ट अळु वडी family Recipes Suralichi vadi Aloo Cha Fatfata मसाला वडी,बाकर वडी गुजराती पात्रा रेसिपी Marathi youtuber authentic food familyvlog Maharashtrian Padarth Marathi Padarth marathi food Vishnu Manohar gavakdil padarth gavran ek khari chav krushnai gazane arvi ke patto ke pakode Amma ki rasoi kids favorite food youtube Recipes videos ⬇️ Like and subscribe करा १किलो बेसनचे लाडू रेसिपीज⬇️ पहा https://youtu.be/ZPyInjjw7BQ खारी सारखी करंजी⬇️रेसिपीज पहा https://youtu.be/8D23SDmbLyA हलवाई स्टाईल आईसक्रीम मलाई बर्फी⬇️रेसिपीज पहा https://youtu.be/W4_1PqJZc_I अंबाडाची पातळ भाजी⬇️रेसिपीज पहा https://youtu.be/Cz0tutEXDVQ चटपटीत चिझी सॅन्डविझ झटपट रेसिपीज पहा⬇️ https://youtu.be/hTGv-hnwVsw धन्यवाद Thank you so much












0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ