!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : पावसाळी रानभाजी कंटोळी रेसिपीज | How To Make Ranbhajhi Kantoli Recipes

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

पावसाळी रानभाजी कंटोळी रेसिपीज | How To Make Ranbhajhi Kantoli Recipes

 सर्वात ताकदवान रानभाजी कंटोळीची भाजी रेसिपीज. 

कंटोळीची भाजी कशी बनवायची?

पावसाळा आला की रानभाज्या डोंगरावर दर्यावर आपोआपच उगवतात. 

अशा आयुर्वेदीक भाज्या कोणी लावत नाहीत अथवा कोणी पेरणी करत नाहीत. 

नैसर्गिकच आपोआपच उगवतात. अशा औषधी गुणधर्म असलेल्या भाज्यात जीवनसत्व मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. 

        कंटोळी भाजीचे नियमित आहारात समावेश असेल तर शरीर तंदुरुस्त राहते.

तसेच वजनावर नियंत्रण राहते.

Kantoli vegetables is good for health. 

कंटोळीत प्रोटिन्स, लोह भरपूर आणी कॅलरिज कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. 

    कंटोळी भाजीत फायबर असल्यामुळेच पाचनतंत्र सुधारते.

कोणाला कंटोळी भाजी खायची नसल्यामुळे त्याचं लोणची करून खाता येते.








आयुर्वेदात अनेक रोगांवर याचा उपयोग केला जातो.

कंटोळीत असणारे मेमोरडीसीन हे उच्च रक्तदाबावर रामबाण उपाय आहेत. 

वजन आणी उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवते.

       कंटोळीत ॲटीॲलजीक आणी एनाल्जेसीक गुणधर्म असल्यामुळेच सर्दी - खोकल्या पासून बचाव होण्यासाठीच उपयुक्त आहेत.

           नेत्ररोग, ह्यदयविकार तसेच कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी सुध्दा कंटोळीची भाजी फायदेशीर ठरते.

हे ही वाचा :--https://youtu.be/mn87AvKgTbQ

             पहा 👆 पाथरिची रानभाजी youtu.be video 

            म्हणूनच 

कंटोळी किंवा कार्टूल रानभाजी असून त्यात औषधी गुणधर्म आहेत

 कंटोळी चवीला अप्रतिम असून.भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आहेत. 

दररोज खाण्यात असल्यामुळेच शरीर ताकदवान होते.

मांसाहार पेक्षा यात भरपूर प्रोटिन्स आहेत. 

फायटोकेमीकल्स मुळे शरीर निरोगी राहतात 

भाजीतील ॲन्टीऑक्सिडेंट मुळे रक्त शुध्द राहते.

त्वचा संबंधित रोगापासून रक्षण करतात. 

या भाजीच्या सेवना मुळे वजन कमी होण्यास मदत होते.

कंन्टोळी च्या भाजीत फायबर चे प्रमाण अधिक असल्यामुळेच पचन व्यवस्थित होऊन पाचनतंत्र सुधारते.

      तसेच उच्च रक्तदाबावर रामबाण उपाय आहेत कंटोळी

      कंटोळी भाजीला रानकारली ही संबोधतात. 

काटेरी पोपटी कंटोळीची भाजी कशी बनवतात. हे अनेक लोकांना माहित नसेल. 

पण या भाजीतील औषध गुणधर्म आणी या भाजीतील चव यामुळे ही भाजी घेण्यास भाग पडते.

पावसाळ्यातील आरोग्यवर्धक नैसर्गिकच आपोआपच उगवतात या भाजीमुळे आदिवासींना उदरनिर्वाहास हातभार लागतो.

असे कंटोळी भाजी आणण्यासाठी आदिवासींना डोंगरावर,जंगलात, दर्या, खोर्‍यात फिरावे लागते.

काटेरी झुडपात कंटोळीचा वेल पसरलेला असतो.

अशा ठिकाणी विषारी सापांचे वास्तव्य असते.त्याची पर्वा न करता

आदिवासी महिला कंटोळीची भाजी शोधून काढतात.

अशा तर्‍हेने दिवसभरातून जमवलेली कंटोळी बाजारात पळसाच्या द्रोणातून विक्रीसाठी आणली जातात.

पावसाळ्यातील कंटोळी भाजीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते.

विषेशता श्रावण महिन्यात कंटोळीच्या भाजीवर लोंक उपवास सोडतात. 

त्यामुळेच आदिवासींना कंटोळी भाजीच्या विक्रीतून ३०० ते ४०० रुपयांपर्यंत कमाई होते.


साहित्य :--

४ वाटा कंटोळी भाजी

४ हिरव्या मिरच्या

१ मोठा कांदा

१/४ खोबराचा किस

१ चमचा लाल तिखट 

१ चमचा मोहरी 

१ चमचा जीरे

तेल 

मीठ


कृती :--

प्रथम बाजारातील आणलेली कंटोळी    

स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यावेत 

स्लाईसर असेल तर कंटोळी बारीक कापून घ्यावेत किंवा चाकूने बारीक चिरून घ्यावेत. 

आता फोडणीची तयारी.

एक मोठा कांदा,४ मिरच्या चिरून घ्यावेत. 

गॅस वर पॅन गरम झाल्यावर तेल घाला.तेल तापल्यावर १ चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर १ चमचा जीरे घाला.नंतर चिरलेला कांदा घाला.नंतर कडीपत्ता घाला.

कांदा लाल झाल्यावर त्यात चिरून ठेवलेली कंटोळी घाला आणी एक सारखे परतून घ्यावेत. 

नंतर १ चमचा लाल तिखट घाला.

खोबरेचा किस घालून परतून घ्यावेत मग मीठ चवीनुसार घालून परतून घ्यावेत आणी झाकण ठेवून वाफेवर 

कंटोळी भाजी शिजवून घ्यावेत. 

अशा तर्‍हेने कंटोळी भाजी शिजवून घ्यावेत. 

खाण्यास तयार आहे.कंटोळीची भाजी.

हे ही पहा :--

You tube video Link ⬇️please Like and subscribe ⬇️ 

पाथरीची औषधी रानभाजी रेसिपीज ⬇️ प्लिज लाईक आणी सबस्क्राईब करा.

https://youtu.be/mn87AvKgTbQ

चिंचेची चटणी रेसिपीज ⬇️पहा लाईक करा.शेअर आणी सबस्क्राईब करा.

https://youtu.be/M0YrGW1mmwY

बांगडा.फ्राय रेसिपीज⬇️ आवडल्यास लाईक करा.शेअर आणी सबस्काईब करा.

https://youtu.be/-IM2mZx5CJU

मेंदुची भाजी रेसिपीज ⬇️लाईक आणी सबस्काईब करा.

https://youtu.be/hCbBsHfI03s

शेवळेची रानभाजी रेसिपीज ⬇️

https://youtu.be/0oNMwlOEkp8

Others channel Link ⬇️ples,Like, subscribers and Follow me 

Youtube channel Link ⬇️ 

https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1watch&Lick 

Fecebook Link ⬇️ Follow me 

https://www.facebook.com/nanda.karande.77

Instagram Link ⬇️ please Like 

https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=

Twitter Link ⬇️ please Like 

https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09

@नंदा कारंडे रेसिपीज 

@Nanda karande recipes 

@nanda karande recipes 

पहा आवडल्यास लाइक करा,शेअर करा.कमेंट करा आणी सबस्क्राईब जरूर करा. 

धन्यवाद. 







        

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ