महाराष्ट्रीयन पध्दतीत ताकाची कढी रेसिपीज | How To Make Taakachi kadhi Recipe
महाराष्ट्रीयन पद्धतिमध्ये बनवलेली ताकाची कढी
how to make maharashtrian kadhi
भारतीय संस्कृती मधे कढी चे स्थान महत्त्वाचेच आहे.
कढी सर्व देशात राज्यात खाल्ली जाते.
आहारशास्त्रात कढीचे स्थान महत्त्वाचेच आहे.
आपल्या आहारात कढीचा समावेश असल्यामुळेच आपल्या शरीराला खूप फायदेशीर होतात.
Youtu.be vodio
महाराष्ट्रीयन पारंपारिक पध्दतीत ताकाची खमंग कढी रेसिपीज पहा👆
https://youtu.be/8llU9VXX2vs भारतातील बर्याच घरांमधे कढी बनवतात.कढी सर्वाच्या आवडीचा प्रकार आहेत. तसेच सर्व भारतीय घरामधे बनवली जाते.
त्यामुळे कढी सर्वानाच खायला प्यायला आवडते.
उन्हाळा असो किंवा हिवाळा असो किंवा सणवार असो ताकाची खमंग कढी बनवली जाते.
त्यामुळे मनाला आणी पोटाला वेगळाच आनंद मिळतो.
त्यातल्या त्यात गरमागरम कढी पिणे हे सर्वानाच ख़ूप आवडते.घरामधे ताकाची कढी झटपट बनवतात.
पण ताकाची कढी बनवताना ख़ूप काळजी घ्यावी लागते.
नाहीतर कढी फुटून चव बिघडते आणी त्यात दही नासल्यासारखे दिसते.
हा अनुभव खूप गृहिणीला आला असेलच.
आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती मधे कढीला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
तसेच दह्याला पण खाद्यसंस्कृती मधे महत्त्वाचे स्थान आहे.
दह्यामुळे पोटात असलेली उष्णतामान कमी होण्यास मदत होते.
आणखी दह्यापासून पोट स्वच्छ होते.
दही किंवा दह्यापासून बनवली जाणारी कढी हे शरीरासाठी अमृतासमान आह
त्यामुळेच दह्यातील कमालीचा थंडावा शरीरासाठी फायदेशीर आहेत.
तसेच पोट स्वच्छ करण्याची क्षमता दह्यात आहे.
त्यामुळेच दह्यात हे गुणधर्म असल्यामुळेच भारताच्या उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यत आणी पूर्वेपासून ते पश्चिमे पर्यंत दह्यापासून बनवलेला एक तरी पदार्थ असतोच.
दह्यापासून आपण कढी, कढीपकोडा, रायता,मठ्ठा,दही भात, कढी भात, असे एक ना अनेक प्रकारचे पदार्थ आपण बनवत असतो.
भारतात अनेक देशात, राज्यात वेगवेगळया प्रकारची कढी बनवतात.एखाद्या वेळेस फ्रिज मधे
उरलेले दही असेल तर लगेच झटपट दही घुसळून त्याची कढी बनवण्याची पध्दत आहे.
तसेच गुजरात राज्यातील साखर घातलेली किंचित आंबटगोड कढी.सोलापुरी कढी,मराठवाड्यातील कढी,राजस्थान मधील कढी,नागपूर येथील कढी,असे विविध राज्यांतील कढीचे प्रकार,
तसेच खानदेश कढी,
ही होती कढीची माहिती
आता आपण कढीची रेसिपीज पाहू.
साहित्य :--
२ वाटी दही किंवा १लिटर ताक
मोहरी
जीरे
२ मिरच्या
४ पाकळ्या लसुण
कोथिंबीर
कडीपत्ता
२चमचे बेसन पीठ
१ चमचा हळद
मीठ
पाणी
तेल
कृती :--
दही असेल तर दही थोड पाणी घालून घुसळून घ्या.
एक पातेल घ्या.गॅसवर गरम झाल्यावर तेल घाला.
तेल तापल्यावर लसूण ठेचून घालून.त्यात कडिपत्ता घाला,१चमचा मोहरी घालून परतून घ्या.
१चमचा जीरे घाला.जीरे .
मोहरी तडतडल्यावर हळद घालून नंतर घुसळून घेतलेल दही किंवा ताक घाला.
२चमचे बेसन पीठ घालून घुसळून घ्यावेत.
गॅस बारीक करा,आणी कढीत मोठा चमचा घालून एकसारखे ढवळत रहावे.
त्याने कढी ऊतू जाणार नाहीच. आणी फाटणार नाही.
शिजलेली कढी वर यायला सुरुवात झाली की गॅस बंद करावा.
हे ही वाचा :---
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-chavalichi-usal-recipes.html
१) कढी फाटूनये साठी टिप्स :--
१ )कढी शिजवल्यावर मीठ टाका.
२ ) कढीला फोडणी दिल्यावर ते कढी शिजेल पर्यंत एक सारखे चमचाने ढवळत रहावे
त्यामुळेच कढी उतू जात नाही आणी कढी फाटणार नाहीत
३ )कढी वर वर यायला लागली की लगेच गॅस बंद करा.
४ )कढीला उकळी येऊ देऊ नये.
५ )उकळी आलेली कढी नेहमी फाटते.
आणी दही नासलेल्या सारखी कढी दिसते.
Youtube channel Recipes Video ⬇️
Please, Like and subscribe Link ⬇️
रेड साॅस पास्ता रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/ehi83mg3RGU
रुचकर आंबाडयाची भाजी रेसिपीज पहा.⬇️
https://youtu.be/Cz0tutEXDVQ
चटपटीत चीज सॅन्डविझ रेसिपीज पहा.⬇️
https://youtu.be/hTGv-hnwVsw
साजूक तूप रवाळ बनवण्याची योग्य पध्दत ⬇️
https://youtu.be/QIRHLh6w7Uw
भंडारदरा धबधबा पहा ⬇️
https://youtu.be/7GOqrwMsYJE
Youtube channel Like and subscribe Link ⬇️
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
Handle Link ⬇️
#nandakaranderecipijvilogshortsanoffcial
Fecebook Link ⬇️ Follow me
https://www.facebook.com/nanda.karande.77
Instagram Link ⬇️ please Like
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
धन्यवाद.
@नंदा कारंडे रेसिपीज
@Nanda karande recipes
@nanda karande recipes
लेबल: ताकाची खमंग कढी रेसिपीज | How To Make Taakachi kadhi Recipe |Lunch Recipe








0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ