!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : ज्वारीची भाकरी रेसिपीज मराठीत | How To Make Jwarichi Bhakari recipes

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

ज्वारीची भाकरी रेसिपीज मराठीत | How To Make Jwarichi Bhakari recipes

  ज्वारीची भाकरी रेसिपीज मराठीत | How To Make Jwarichi Bhakari recipes

परफेक्ट लुसलुशीत खरपूस ज्वारीची भाकरी रेसिपीज
                  https://youtu.be/PmTCNfhXf
                           ज्वारीची भाकरी 
               महाराष्ट्रात ज्वारीच्या भाकऱ्या ह्या जास्तीतजास्त पुणे,सातारा ,सांगली, कोल्हापूर,सोलापूर आणी कर्नाटक सीमा भागात खाल्ली जातात. 
संध्याकाळच्या जेवणात भाकरी असते.
काहींच्या जेवणात सकाळ,संध्याकाळ भाकरी असते.
या लोकांचे जेवणात भाकरी असल्याशिवाय पोट भरत नाही.
कारण या ठिकाणी ज्वारीचे पिक मुबलक प्रमाणात येते.
म्हणूनच यांच्या जेवणात जास्त भाकरी असते.
                 मटणाच्या जेवणात तर हमखास भाकरी दिसते.
तसेच वांग,उडदाची डाळ,उडदाचं घुटं, हरभरा भाजी,पावट्याची भाजी
ह्या भाजीला सोबत भाकऱ्या असतात.
                    इथल्या भाकऱ्या एकच खाल्ली ना तरीही पोट तुडुंब भरून जाते.
कारण इथल्या भाकरीची आकार हा खूप मोठा असतो.
अशा मोठा आकार असलेले भाकरी पातळ आणी त्या भाकरी वरचा सुटलेला पापुद्रा इथल्या भाकरीची खासियत आहे.
लहाणपणी आम्ही त्याला भाकरीचा पापड म्हणायचो.
मुंबईत गॅस वर भाकरी बनवतात.
पण गावा कडे मे मधील उन्हाळ्यातील सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत सर्व जण येतात. मग काय सकाळी भाकऱ्या 
बनवण्यासाठी चुल पेटवली तर दुपारी १ वाजले २वाजले तरीही कळत नाहीत.

हे पण वाचा :--
https://nandakarande111.blogspot.com/2023/07/how-to-make-pathari-chi-ranbhajhi.html

                    गावाला गेल्यावर चुलीवरच्या जेवणाचे अप्रूप वेगळेच. 
 चवीनुसार चुलीवर स्वयंपाक होताहोता वेगवेगळ्या विषयांवर होणारे गप्पागोष्टीत सर्व जण रंगून जातात.
                    चुलीवर भाकरी करता करता ,चुलीवरच्या लोखंडी तव्याच तापमान योग्य राखता, चुलीचा जाळ एकसारखा करत भरभर भाकरी थापून तव्यात एक,परातीत थापलेली एक आणी चुलीच्या तोंडाच्या ठिकाणी शेकायला ठेवलेली भाकरी पुर्ण शेकून दुरडीत टाकणे.हे skill full work आहे.

                    चुलीच्या तोंडावर शेकायला ठेवलेली भाकरी फुगून त्याचा सुटलेला पापुद्रा ला खरपूस वास आला की तोंडाला पाणी आल्यावाचून राहत नाही.
                     ज्वारी मधे फायबरचे प्रमाणा अधिक असते.तसेच ज्वारी मधे ग्लुटेन चे प्रमाण नसल्यामुळे पोटाचे कोणतेच विकार होत नाहीत. 
ज्वारी पचायला हलकी आहे.नियमित आहारात समावेश असल्यामुळेच पाचनतंत्र चांगले राहते.
ज्वारीच्या एका कपात मधे २२ग्राम इतके प्रोटिन्स आहेत. 
                  हेच प्रोटिन्स शरीराला उर्जा देण्याचे काम करतात. आणी हेच प्रोटिन्स शरीराच्या प्रोटिन्स साठी उपयुक्त आहेत. 
हेच कारण असल्यामुळेच ज्वारीची भाकरी खाणारे लोक जास्तच वेळ ताजेतवाने राहतात. 
आणी पुढच्या कामासाठी कायम तत्पर असतात.
                    ज्वारीची भाकरी खाल्याने अन्नाचे पचन तर होतेच पण रक्तातील साखर पण नियंत्रणात राहते.
                आर्यन लोह मुळे लाल रक्तपेढी वाढण्यास मदत होते 
                   त्यामुळेच ॲनेमीया या रोगापासून सुध्दा बचाव होण्यासाठीच मदत होईल. म्हणूनच आपण दिवसातून एक जरी ज्वारीची भाकरी खाल्ली तरी आपल्या शरीराला ५८% काॅपर मिळते.
                      आपल्या भारतीय लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच आहे.हे आपण सर्वांनाच सांगतो.
पण हे सर्व आपण पुढच्या येणाऱ्या पिढीला पारंपारिक पध्दतीत खाद्य पदार्थाची माहीती आणी त्यात शरीराला होणारे फायदे हे सांगणे खुप महत्वाचे आहेत.
                       आणी आवश्यक आहेत. 
गावचे लोक इतके काटक का असतात. आणी ते इतके वेळ
अंगमेहनतीची कामे का करतात. 
याच कारण ते सकस आहार घेतात.
                       त्यासाठी आज आपण ज्वारीची भाकरीची रेसिपीज पाहणार आहोत.






हे ही वाचा :--
 https://nandakarande111.blogspot.com/2023/07/how-to-make-ranbhajhi-kantoli-recipes.html

                साहित्य :--
२ वाटी ज्वारीच पिठ
पाणी

कृती :--

प्रथम एका परातीत ज्वारीचे पीठ घ्यावेत. 
थोडे थोडे पाणी घालून पिठ मळून घ्यावेत. 
जेवढे जास्त मळून घ्याल तेवढे जास्त मळलेले गोळा मउ होतो.
एक गोळा घेऊन परातीत थोडे कोरडे पिठ टाका.
हलक्या हाताने गोळ्यावर दाब देऊन भाकरी थापून घ्यावेत. 
थापलेली भाकरी तव्यावर टाकून भाजून घ्यावेत. अशा तरेने सर्व भाकरी करून घ्यावेत.

टिप :--
१ | ज्वारीचे पिठ जर खूप दिवसाचे असेल तर भाकरी व्यवस्थित येत नाहीत.भाकरी करताना तुटते.
       खुप दिवसाचे पिठ वसवशीत असते. त्यामुळेच पिठाला चिकटपणा नसतो.
त्यासाठी तव्यात पाणी घालून गरम झाल्यावर पिठात लागेल तसे टाकावे
२ | किंवा ज्वारीच्या पिठाचे उकड काढून घ्यावेत. 
३ |हायब्रिड ज्वारीची भाकरी थापली की तुटते.त्यासाठी पण पिठात गरम पाणी घालून पिठ मळून घ्यावेत.
गरम पाणी घातल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो.
आणी भाकरी छान थापली जाते.
Youtube video Link ⬇️ please Like and subscribe 
रानभाजी शेवळेची भाजी ⬇️
https://youtu.be/0oNMwlOEkp8
बांगडा फ्राय रेसिपीज ⬇️
https://youtu.be/-IM2mZx5CJU
मेंदुची भाजी रेसिपीज ⬇️
https://youtu.be/hCbBsHfI03s
रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज ⬇️
https://youtu.be/Cs-x9erYoMk
पाणीपुरी साठी चिंचेची चटणी रेसिपीज ⬇️
https://youtu.be/M0YrGW1mmwY
Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe more 
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1

https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
Fecebook Link ⬇️ Follow me 
https://www.facebook.com/nanda.karande.77
Instagram Link ⬇️ please Like 
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️ please Like 
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
Handal Link ⬇️ please Like and subscribe ⬇️ 
#nandakaranderecipijvilogshortsanoffcial 
@Nanda karande recipes 
@nanda karande recipes 
@Nanda karande Shorts 
@nanda karande shots 





                      
                  

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ