!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : मेथीची भाजी रेसिपीज | How To Make Methichi Bhajhi Recip

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

मेथीची भाजी रेसिपीज | How To Make Methichi Bhajhi Recip

 मेथीची भाजी रेसिपीज मराठी| How To Make Methichi Bhajhi Recip In Marathi 

#मेथीचीभाजी#methichibhaji#methichisukkibhaji

 हिरव्या पालेभाज्या विषयी माहिती :--

                       हिरव्या पालेभाज्या म्हटलं की काहिजण खूप नाक मुरडतात.
तर काहीजण हिरव्या पालेभाज्या खूप आवडीने खातात.
हिरव्या पालेभाज्या काही बाराही महिने मिळतात.
त्यातल्यात्यात मेथी,शेपू,पालक, चवळीची भाजी,तांदुळजा ह्या भाजीला काहीजण चवळीची भाजी म्हणतात.
तसेच काठमाठ भाजी,कांद्याची पात,चंदन बटवा,ह्या झाल्या आपल्याकडे रेग्युलर मिळणाऱ्या भाज्या.
  Youtube video ⬆️तूरडाळ घालून केलेली खाण्यास तयार आहे मेथीची भाजी
      आता पावसाळ्यातील आरोग्यवर्धक सिझनल भाज्या पाहू.
पावसाळ्यातील रानभाजी-चाई, कुरडू,टाकळा,वाघाट्या,फोडशी, 
आणी इतर रानभाजी.
ह्या सर्व भाज्या औषधी आहे.
अशा सर्व भाज्या सर्वगुणसंपन्न तर आहेच. पण आपल्या आहारात नियमित समावेश असल्यामुळेच आपले शरीर सर्वगुणसंपन्न होते.
                          बाराही महिने मिळणारी भाज्या किंवा पावसाळ्यातील वर्षातून एकदा मिळणारे आरोग्यवर्धक आहेत. 
पौष्टिक,आणी भरपूर प्रमाणात जीवनसत्व,मुबलक आहे.
फायबर खूप आहेत. त्यामुळेच शरीरातील पचनसंस्था आणी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच राहते.
मेथीच्या भाजीला हिवाळ्यात चांगलीच चव असते.
आर्यन आणी लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच मेथीची भाजी खाण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. 
तसेच मेथीची भाजी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
                          तसेच मेथीची भाजी खाल्यामूळे सांधेदुखीची समस्या उद्बभवत नाही.
त्यामुळेच आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा नियमित समावेश असावा.
मेथीच्या भाजी मुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन पाचनतंत्र सुधारते.

Methichi Bhajhi - नियमित आहारात समावेश असल्यामुळेच कोलेस्टेरॉलचे प्रमाणात नियंत्रणात राहते.

शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचे काम मेथीची भाजी करते.
त्यामुळेच आपल्या शरीरातील रक्ताचे शुध्दीकरण होत असते.
तसेच मेथीची भाजी नियमित आहारात समावेश असल्यामुळेच वजन नियंत्रणात राहते.आपल्या हद्याचे आरोग्य उत्तम राहते.
रक्तदाबावर नियंत्रण राहते.
अशा गुणकारी मेथी च्या भाजीत व्हिटॅमिन्स,खनिज, जीवनसत्व मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
हे ही वाचा :--
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-varan-recipe.html

थोडीशी मेथीच्या भाजी विषयी माहिती :--

मेथीची भाजी खाताना किंचित कडवट चव लागते.
पण मेथीची भाजी बनवताना थोडे ओले खोबरे आणी शेंगदाण्याचे कूट घातले की भाजीला छान चव येते.
मेथीच्या भाजीत खूप पोषणमूल्य भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच 
आणी मेथीच्या भाजीत औषधी गुणधर्म असल्यामुळेच कर्करोग, उच्चरक्तदाब, मधुमेह हे आजारावर नियंत्रण मिळविण्यात येते.
मेथीची भाजी रोज नियमित आहारात समावेश असल्यामुळेच पोट फुगणे,तसेच बद्धकोष्ठ होत नाहीत. 
तसेच भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळेच पाचनतंत्र सुधारते.तसेच उच्च रक्तदाबावर नियंत्रण येते.
वजनावर नियंत्रण राहते.
मेथीची भाजीचे दोन प्रकार आहेत. 
१ ) समुद्री मेथी २ ) मेथी
समुद्री मेथीचाच एक प्रकार आहेत. 
त्यात खूप प्रमाणात वाळू असते. 
त्यामुळेच या भाजीला खूप धुवून घ्यावी लागेल. 
या भाजीची पाने खूप बारीक असतात.
पण चवीला अप्रतिम आहेत.
समुद्री मेथी खूप लहान आणी नाजूक असते.
समुद्री मेथीची पाने खूप लहान आकाराची असतात. 
खाण्यासाठी चव मात्र अप्रतिम असतात. 
ह्याची ही भाजी कसेही केली तरी छानच लागतात.
हे पण वाचा :--
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-zunka-recipe.html

मेथीची भाजी बनवण्याचे खूप प्रकार आहेत :--

मेथीची भाजी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत. 
जसे सुकी मेथीची भाजी, तुरीची डाळ घातलेली मेथीची भाजी,मुगाची डाळ घालून मेथीची भाजी,मेथीच्या भाजीचे वरण मुगाची डाळ घालून, तसेच तुरीचे डाळ घालून मेथीचे वरण, सुकट मेथी,मेथी पिठल,लसुणी मेथी भरपूर लसुण घालुन केलेली मेथीची भाजी,मेथी बटाटा भाजी.
तसेच रेस्टॉरंट स्टाईल मलाई मेथी,मलाई मटार मेथी,मटार मेथी ह्या अशा रेस्टॉरंट स्टाईल भाज्या आता गृहिणी घरात खाण्यास बनवू लागल्या आहेत.
तसेच मेथीची पातळ भाजी तर बहुतेकजणांची आवडती डिश,मेथीची भजी,मेथीचे कटलेट, मेथीचे मुटकुळे, मेथिचे थेपले हे गुजराथी लोकांचे आवडते पदार्थ, पण आता तर सर्वानाच असे पदार्थ आवडतात. 
मेथीचे पराठे हे ही सगळीकडे प्रसिद्ध आहेत, रुचकर मेथीचे वडे.असे एक ना अनेक प्रकारचे मेथीचे पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत.
मेथीचे आळन,मेथीचे कढण, हे पण बहुतेक पदार्थत खाण्यास घरात बनवली जाते.
                        मेथीची भाजी शिजताना
                      मेथीची भाजी गॅस वर टाकताना
                  खाण्यास तयार आहेत मेथीची भाजी
                      मेथीची भाजी शिजल्यावर 
                         मेथीची भाजी साहित्य 
                    मेथीची भाजी फोडणीत घालताना
                      झाकण ठेवून शिजण्यासाठी
                     तुरीची डाळ घालून मेथीची भाजी

तर आज आपण मेथीची भाजी कशी बनवतात ते पाहणार आहोत.

साहित्य | ingredians :--

१ जुडी मेथीची भाजी | 1 Bunch Methichi Bhajhi
१ / ४ वाटी तुरीची डाळ 
१० / १२ पाकळ्या लसुण 
१ चमचा जीरे 
४ हिरव्या मिरच्या
१ / ४ वाटी शेंगदाणा कूट
१ / ४ किसलेल ओले खोबरे
मीठ 
तेल

How To Make Methichi Bhajhi 

कृती | Method :--

बाजारातून मेथीची भाजी आणल्यावर एका परातीत किंवा सूपात पसरून घ्यावेत. 
मेथीची एक एक काडी घेऊन त्यातील पानं काढून घ्यावेत. 
 किंवा कोवळे कोवळे शेंडे घ्यावेत.
अशा प्रकारे मेथीची भाजी निवडून घ्यावेत. 
नंतर निवडलेली भाजी एका परातीत घेऊन २ ते ३ पाण्याने धुवुन घ्यावेत. 
आणी चाळनीत निथळत ठेवावेत.
प्रथम एक कढई घ्यावेत. 
गॅसवर कढई मध्यम आचेवर तापवत ठेवा.
त्या आधी लसूण ठेचून घ्यावेत.
मिरच्या चिरून घ्यावेत.
अर्धा तास आधी तूरडाळ वाटीत भिजत घाला.
नंतर कढई तापल्यावर त्यात तेल घाला.
तेल तापल्यावर लसूण ठेचलेला घाला.
१ चमचा जीरे घाला.नंतर चिरलेल्या मिरच्या घाला.
हे सर्व तेलात परतून घ्यावेत.
नंतर भिजवून ठेवलेली तूरडाळ घाला.
मग मेथीची भाजी घाला.
परत एकदा परतून घ्यावेत. झाकण ठेवा.
एक वाफ येऊ द्यात. 
मग वरून ओले खोबरे,शेंगदाण्याचे कूट घालून परत एकदा परतून घ्यावेत. 
नंतर मीठ चवीनुसार घालून झाकण ठेवा.
भाजीला पाणी सुटेल.
त्याच पाण्यात तूरडाळ अर्धीकच्ची शिजवून घ्यावेत. 
संपूर्ण भाजीतील पाणी आटवून घ्यावेत. 
मेथीची भाजी खाण्यास तयार आहे.
अशा प्रकारे मेथीची भाजी शिजवून घावेत.

टीप :--

१ ) मेथीची भाजी निवडल्यावर २ ते ३ पाण्याने धुवुन घ्यावेत.
मग संपूर्ण पाणी निथळल्यावर चिरून घ्यावेत. 
२ ) मेथीच्या पातळ भाजीत लाल तिखट ऐवजी हिरव्या मिरच्या चिरून घाला.
३ ) चिरल्या नंतर मेथीची भाजी कडवट होते,त्यासाठी ओले खोबरे अथवा शेंगदाण्याचे कूट घाला.
भाजीला चव फार छान येईल.
 ४ ) मेथीची भाजी निवडताना पानांवर पांढऱ्याशुभ्र रेषा असल्यास अशी भाजी खाण्यास घेऊ नका.
कारण त्या पानात नागअळी असण्याची शक्यता असते.
५ ) मेथीचा भाजीत फोडणीत कांदा घातल्यावर भाजीला खूप छान चव येते.

Youtube Recipes Video Link ⬇️ please, Like and subscribe Link ⬇️ 

आंब्याचे लोणचे रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/NBl9jbGfQhI
चिकन सिक्टीफाय रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/tsRuruQ25o8
हलवाई स्टाईल मैसूरपाक रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/gISwREV88EM
गोलपट्टी समोसा रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/ZhECXdMBnlU
सोयाबीन चिल्ली रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/ye6ywIriuIo
Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️ 
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
Fecebook Link ⬇️ please follow me 
https://www.facebook.com/nanda.karande.77
http://fb.com/stars
Instagram Link ⬇️ please Like ⬇️ 
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️ please Like 
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
Websait Link ⬇️ please Like and subscribe 
https://nandakarande111.blogspot.com
https://recipenanda.com
Youtube Playlist Link ⬇️ please Like and subscribe ⬇️ 
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj
@Nanda karande recipes 
@nanda karande recipes 







लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ