!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : फक्त दहा मिनिटात बनवा झटपट आणी चमचमीत घोसाळ्याची भाजी रेसिपीज|How To Make Ghosalyachi bhajhi recipe

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

फक्त दहा मिनिटात बनवा झटपट आणी चमचमीत घोसाळ्याची भाजी रेसिपीज|How To Make Ghosalyachi bhajhi recipe

 फक्त दहा मिनिटात बनवा झटपट आणी चमचमीत घोसाळ्याची भाजी रेसिपीज|How To Make Ghosalyachi bhajhi recipe

            घोसाळेला गिलके,चपटा दोडका,किंवा घोसाळे पण म्हणतात.
घोसाळेच्या बिया लावल्यावर त्याची वेल येते.
मग ती वेलवर्गिय असल्यामुळेच त्याला मंडप उभारण्यात येतो.
आणी घोसाळेचे पिक घेतले जाते.घोसाळे हे काकडीच्या आकारा सारखे दिसते.
काकडी सारखीच दंडगोलाकार गुळगुळीत याची फळे असतात.
                     घोसाळ्याची भाजी रेसिपीज पहा
             https://youtu.be/PdxMP9wan0U
             आज आपण घोसाळे भाजीची माहीती घेऊ.
घोसाळे आणी दोडका दिसायला थोड्याफार फरकाने सारख्याच दिसतात. 
घोसाळे साधारण काकडी सारखी दिसतात. 
तर दोडका याला वरती सालीला शिरा असतात.
या भाज्या जास्त कोणी आवडीने खात नाहीत. 
काहींना घोसाळी आणी दोडका यांतील फरक माहीत नाहीत.
 या दोन्ही भाज्या वेलवर्गिय आहे त्यामुळेच या भाज्या वेलीवर येतात. 
या वेलीला अगोदर पिवळ्या रंगाचे फूल येतात. मग नंतर फळ म्हणजेच घोसाळी येतात. 
घोसाळे चा आकार निमुळत्या काकडी सारखा असतो.पण रंग हिरवा असतो.
                 घोसाळे हे मुख्यत्वेकरून भारतातील पीक आहे.तसेच उत्तर आफ्रिकेतील आणी आशिया खंडातील उष्ण कटिबंधात घोसाळेची लागवड केली जाते.
मंडपाच्या आधारावर वाढलेली वेल तणाच्या साहाय्याने वर चढते.
घोसाळे वेलीची पाने साधी, मोठी व लवदार असतात.
 घोसाळ्याच्या बिया काळ्या किंवा करड्या चपट्या असतात.

हे ही वाचा :--
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-chavalichi-usal-recipes.html

                 आर्युवेदात घोसाळेची भाजी किंवा रस खूप फायदेशीर आहेत. 
 तसेच शरीरातील उष्णतामान कमी करण्यास मदत करते. खूप काम केल्या मुळे आलेला थकवा कमी करण्यासाठी घोसाळ्याची भाजी खाल्ली जाते.
                    वजन कमी करण्यास घोसाळयाची भाजी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते.
तसेच घोसाळे बारीक तुकडे करुन उकडून खाण्याने शरीराचे वजन कमी होते.
                      एखाद्या रुग्णाचे जखमा जर चिघळलेल्या असतील तर घोसाळ्याची भाजी खाल्याने जखमा लवकर भरतात. 
जर कोणाच्या पोटाला सूज आली असेल तर बिना तेल तुपाची भाजी शिजवून खाल्ली जातात किंवा घोसाळेचा रस पितात. 
पोटाची सूज कमी होण्यास मदत होईल.
                        छातीत खूप कफ साठल्यास उलटी करून कफ काढण्या करता घोसाळेचा रस पिण्यास देतात. 
शरीराला कोणताही त्रास न होता उलटी होते.आणी कफ बाहेर पडतो.
                   घोसाळ्याची भाजी फोडणी दिल्यावर 
                    घोसाळ्याची भाजी तयार झाल्यावर   
                       घोसाळ्याची भाजीची फोडणी
                       घोसाळ्याची भाजी शिजताना
                        घोसाळ्याचे भाजीचे साहित्य 
                          लठ्ठपणा ही आजकाल बहुतेक जणांना भेडसावणारी समस्या आहेत. 
त्यामुळेच आपण आहारात घोसाळे भाजीचा नियमित आहारात समावेश असल्यामुळेच वजन नियंत्रणात येते.
आणी घोसाळे भाजीत तंतूमय पदार्थ असतोच त्यामुळेच पाचनतंत्र सुधारते.
                          त्यामुळेच ही वेलवर्गिय भाजीत खूप व्हिटॅमिन्स,जीवनसत्व मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
आणी ही भाजी खाण्याने पोटही भरते.
तसेच वजनावर नियंत्रण येते.

हे पण वाचा :--
https://nandakarande111.blogspot.com/2023/07/how-to-make-ranbhajhi-kantoli-recipes.html
                          घोसाळे भाजीत लोह,कॅल्शियम, फाॅस्परस आणी क जीवनसत्व,प्रथिने,खनिज मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. रक्तदाब,मधुमेह,ह्यदयविकार तसेच हायकोलेस्टेराॅल असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात नियमित घोसाळेच्या भाजीचा समावेश करावा.
 कारण घोसाळ्यात कमी उष्मांक आणी तंतूमय पदार्थ खुप असल्यामुळेच असे विकार आजार असलेल्या रुग्णांना घोसाळेची भाजी खाण्याने खूप प्रमाणात प्रोटिन्स, फायबर शरीराला खूप फायदेशीर आहेत. 
                       तसेच घोसळ्याची जी खाण्याने असे आजार आटोक्यात आणण्यात येते.अंगाचा दाह होत असेल तर घोसाळ्याचा रस अंगाला लावण्याने शरीराचा दाह कमी होतो.
तसेच आम्लपित्त आणी अपचन मधेही घोसाळ्याची भाजी गुणकारी आहे.
                         घोसळेची भाजी बनवतात, डाळ घालून घोसाळेची भाजी,घोसाळेची भजी तर उत्तमच बनते,तसेच घोसाळेचे सूप पण बनवतात.
आर्युवेदामधे घोसाळे बारीक चिरून मीठ घालून उकडून खातात. वजन कमी करण्यासाठीच.
अशी ही बहुगुणी घोसाळ्याची भाजी आपल्या आहारात नियमित आहारात समावेश असेल तर शरीरातील रोगप्रतिकारक वाढते.
तसेच आपल्या शरीराला खूप फायबर, प्रोटिन्स मिळेल. 
आणी आपले शरीर कायम तंदुरुस्त राहील. 
आता साहित्य पाहू:--
१ किलो घोसाळी
१ कांदा
१ टोमॅटो 
१ चमचा जीरे 
१ चमचा मोहरी
 ५ कडीपत्ता
लाल तिखट 
शेंगदाण्याचे कूट
कोथिंबीर 
कृती :--
प्रथम घोसळी स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. 
नंतर बारीक चिरून घ्यावेत. 
कांदा,टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. 
आता गॅसवर कढई ठेवा.
कढई तापल्यावर तेल टाका.
तेल तापल्यावर मोहरी, जीरे घाला.
नंतर मोहरी तडतडल्यावर कांदा लाल होई पर्यंत भाजून घ्यावेत. मग कांदा लाल झाल्यावर टोमॅटो टाकून परतून घ्यावेत. 
मग चिरून ठेवलेली घोसाळेची भाजी घाला.
नंतर लाल तिखट टाकावेत. 
शेंगदाण्याचे कूट घालून परतून घ्यावेत.
मग मीठ चवीनुसार घालून परतून घ्यावेत. 
नंतर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घावेत. 
मधे मधे चेक करून बघा भाजी शिजली का.
अशा तर्‍हेने घोसाळेची भाजी शिजवून घ्यावेत. 
घोसाळे शिजवल्यावर वरुन कोथिंबीर घाला.
खाण्यास तयार आहे घोसाळीची भाजी.
Youtub chanl Recipes video Link ⬇️ 
Ples, Like and subscribe Link ⬇️ 
नाताळ विषेश प्लम केक रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/IRL69Yv7cVQ
मसाला पावडर रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/Sp4GMku2Fyw
पाईनापल शिरा रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/SFyfCtD1bo8
जाळीदार खुसखुशीत अनारसे रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/CoK_Cj_lRbI
वेज मनचाहो सूप रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/nJjsxwiVl1E

Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe 👍shear and 🔔icon press
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1

https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts

Handal Link ⬇️ 
@nandakaranderecipijvilogshortsanoffcial 

Fecebook Link ⬇️ please follow me 
https://www.facebook.com/nanda.karande.77

Fecebook star 🌟 Link ⬇️
http://fb.com/stars

Instagram Link ⬇️ please Like 
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=

Twitter Link ⬇️ 
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09

Websait Link ⬇️ please subscribe 
https://recipenanda.com/190-2/

https://nandakarande111.blogspot.com

Youtube Playlist Link ⬇️
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj

https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g
@Nanda karande recipes 
@Nanda karande Shorts 



                         
            

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ